STORYMIRROR

Uddhav Bhaiwal

Romance

3  

Uddhav Bhaiwal

Romance

पावसाच्या चारोळ्या

पावसाच्या चारोळ्या

1 min
328

आला पाऊस पाऊस

तळे साचले अंगणी

माझ्या उदास मनात

उमलली नवी गाणी

....................................

पहिल्या पहिल्या पावसात

भिजण्याची मजा न्यारी

पहिल्या पावसाच्या या सरी

मनास देती नवी उभारी

......................................

थंड, चावरा, खट्याळ वारा

त्यातच पडती पाऊसधारा

प्रणयाचा मग खेळ रंगतो

अधर चुंबिते अधराला

   *****


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance