Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Anil Chandak

Classics

4.6  

Anil Chandak

Classics

पावसाची बहार

पावसाची बहार

1 min
370


रिमझिम, रिमझिम, घन बरसत आला !

ग्रीष्माच्या काहिलीतूनी, मुक्त करूनी जगाला!!1


ढोल, ढगांचा वाजता, खेळ विजांचाही चाले !

सौदामिनीचे नृत्य पाहुनी, भयभीत झाले !!2


मृग सरी कोसळत्या, बळीराजा सुखावला !

सुख टपटप बरसता,दिलासा सृष्टीला !!3


गंध, मातीचा पसरे, तृप्ती, बेहोषी धरासी !

पहिला पाऊस पडता, आनंद तो,जनांसी!!4


नुर पाहता धारांचा, प्रिया बावरी हसली !

पयोधरांसी मिलनी,धरा चैतन्ये भारली !!5


येता ऋतु पावसाळा,चौफेर वाहते पाणी !

शाळेतुनी घरी परतण्यां, मोठी आणिबाणी!!6


मुले ओंजळी भरूनी,पाण्यात,गिरक्या घेती !7

पाणी एकमेकांच्या ही, अंगावरी उडवीती !!7


टपटप गळे मोती, वृक्ष पानापानांतुनी!

आनंदे खेळती मुले,कागदी होड्या सोडुनी!!8


सुर्याची किरणे,अलगुज ढगांशी करूनी !

थेंब थेंब,चमकवी, इंद्रधनु फुलवुनी!!9


थेंबाचा अलवार स्पर्श, तनांला तो भिजवी!

शहारूनी काटा येता, मने जनांची खुलवी !!10


बळी कामांसी लागतो, मुक्त मातीची ढेकळी !

कोंभ धरात अंकुरे, हिरवाई रानोमाळी !!11


सखीच्या आठवांनी, भुतकाळी मन रमले !

पहिला पाऊस पडता, अश्रु गाली ढळले !!12


Rate this content
Log in