STORYMIRROR

Manda Khandare

Tragedy Others

3  

Manda Khandare

Tragedy Others

पावसाचे पांग

पावसाचे पांग

1 min
232

आभाळाच्या काळजावर

घातला कुणी घाव असा. 

कुणाच्या हृदयाच्या हुंदक्या ने

केला त्यावर वार असा. 


कुणाच्या मनाचें तुकडे

असे इतस्ततः विखुरले गेलेत. 

कुणाच्या ओठांवरच्या

शब्द स्फोटकाने, 

सोडला त्यवार बाण असा


गडगडले ते, तडफडले

उगा भ्रमिष्टासारखे वागले. 

तुफानासारखे येऊन, 

सारे थैमान त्याने घातले


आला आला म्हणता म्हणता

सारे वाहुन नेले. 

नदी, नाले, बंध, पुल

सारे तुटून गेले. 


कुणाच्या दु:खऱ्या मनाच्या

हाके ने, त्याला असे येण्यास

भाग पाडले. 

कुणाच्या डोळ्यातल्या पुराला

साथ देऊन, 

 त्याने असे पांग फेडले. 


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy