पावसाच येणं
पावसाच येणं
तुझ्या सोबत तो ही यायचा.
नको नको म्हणता,मला चिंब भिजवायचा.
तू येण्या आधी उगाच मनाला हुरहूर लागायची.
आठवणीची मनात गर्दी व्हायची.
न बोलता ही सगळ तुला समजत असायचे.
तो पाऊस ही तसाच,अबोल होऊन त्याच बरसण,
कधी धो धो मुसळधार होऊन रणकंद माजवण.
तुझ्यातल्या मूक भावनांना वाट मोकळी करून देणं.
तू आणि मी आताशा एकच झालो होतो.
स्वप्नातल्या जगातून वास्तवात आलो होतो.
पाऊस आणि प्रेम काही सारख नसतं.
उगाच कथा,कवितेत पाऊस मिरवन.
नको खोट्या भ्रमात जगू,
पाऊस कधीचा संपला.
तुझ्या माझ्या स्वप्नांचा गाव मागे राहिला.
आज ही तो वेळे वर येतो,मनाला भिजवत राहतो.
शोधत राहते त्याच्यात तुझ्या खाणाखुणा..
पाऊस कधीचा संपतो,हाती काही लागत नाही.
तू कुठेच नाहीस हे मनाला समजत नाही.
पाऊस दरवर्षी तसाच येतो पण,
तुझं येणं मात्र झालं नाही..

