पाऊसगंध
पाऊसगंध
सखे चिंब पावसात चल
आज दोघे मिळून भिजून घेऊ
उद्या नसू कधी सोबतीला आज
पावसात थोड काही बोलून घेऊ
क्षण घेतो हिशोब आयुष्याचा
ही सुख दुःख निहारित
दुःखे वाटून थेंब- थेंबात
चल गुलाबी स्वप्ने बघून घेऊ
असू दे ओठांवर हास्य नेहमी
नको पावसाशी वैर धरू
उधळून खुशाल पाऊसगंध
या गगन बंधात सौख्यात राहू...

