💦 पाऊस💦
💦 पाऊस💦
थंड थंड हा येतो वारा
सोबत घेऊन पाऊस धारा
पावसात या भिजुनी किती
हर्ष वाटते या मनाला
पाऊस माझा निसर्ग राजा
शेतकरी हा सांगतो जगाला
शेतकरी हा सांगतो जगाला !!१!!
रिमझिम रिमझिम पडतो
पाऊस
पहा किती दर-वर्षाला
पावसाची ही किमया न्यारी
कधीच नाही चूकउन वारी
नाही दिला कधी धोका आम्हाला
नाही दिला कधी धोका आम्हाला !!२!!
चोही बाजूंनी ढग दाटून येते
सडा मोत्याचा सिंपूनी जाते
पावसाने किती हर्याली येते
हर्ष सर्वांना देऊन जाते
चारा होतो गुरा-ढोराला
डब-डब पाणी येते झऱ्याला
हूरहूर वाटत नाही मनाला
हूरहूर वाटत नाही मनाला !!३!!
धरती माता प्रसन्न होते
पाऊस जेव्हां पडूनी जाते
पावसात या भिजुनी किती
पहा सुखाचे क्षण हे आले
नवे-निराळे जीव-जंतू सारे
पावसात नाहून गेले
दुःख मागचे विसरून सारे
भान जगाचे विसरून गेले
भान जगाचे विसरून गेले !!४!!
कवी युवराज सांगतो ऐका
मित्र नाही पावसा सारखा
साठवून ठेवा पाऊस पाणी
नाही होणार पुढे कसलीच हानी
जीवन अधिक समृद्ध होईल
पृथ्वीतलावर टिकुनी राहील
सत्य होणारच माझी ही वाणी
सत्य होणारच माझी ही वाणी !!५!!
