STORYMIRROR

Yuvraj Dakhore Patil

Inspirational Others

3  

Yuvraj Dakhore Patil

Inspirational Others

तुला सोडूनी जाणार आहे

तुला सोडूनी जाणार आहे

1 min
263

किती अंधार जीवनात 

कुठ धूप आहे रे

माझ्या मुळेच इतकं

तुला दुःख आहे रे

कळत रे मला किती

जीव कासावीस होतो

माझ्यासाठी तू 

किती रे धडपडतो

नको मला तुझा 

कसलाच त्याग

आनंदी होईल मी 

प्रेमानं डोक्यावरून 

जरी हात फिरवलास

दादाला सांगणं इतकं 

नको रागवू माझ्यावर

मी जन्मभर थोडीच राहणार आहे

मी पण एक दिवशी दूर 

तुला सोडून जाणार आहे !!१!!


बाबा येईल आठवण तुझी रे फार 

तुला सोडूनी जाण्याचा नाही होत रे विचार

मी गेल्यान रडू नको रे बाबा 

नेहमी चेहरा प्रसन्न ठेवत जा

आठवणीने वेळेवर जेवण करत जा 

तब्येतीची बाबा नेहमी काळजी घेत जा

मी नसल्यानं तुझ बाबा कसं

होणार आहे 

हीच चिंता रोज

मला सतवणार आहे

किती बाबा मला तू केलं रे जतन

शेवटी बाबा आहे मी परक्याचचं धन

अन् हे तुला बाबा परतवावंच लागणार आहे 

मन नसल तरी 

मी एके दिवशी दूर 

तुला सोडून जाणार आहे !!१!!


उपकार तुझे बाबा मी 

नाही कधीच विसरणार

किती मायेनं माझा तू 

केला रे सांभाळ

कधी आईची आठवण

येऊच दिली नाहीस

अस कधीच नाही झाल की 

माझी हाऊस पुरवली नाहीस

जे मी मागितलं ते दिलं आहेस

माझ्यासाठी बाबा तू 

किती रे केलं आहेस

तुझे ऋण मी कुठे रे फेडणार आहे 

बाबा मी एके दिवशी दूर

तुला सोडून जाणार आहे !!३!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational