STORYMIRROR

Yuvraj Dakhore Patil

Others

4  

Yuvraj Dakhore Patil

Others

यालाच का गं प्रेम असे म्हणतात

यालाच का गं प्रेम असे म्हणतात

1 min
174

तुझ्याकडे पाहून 

मन माझे हसले

या अगोदर असे 

नाही कधीच दिसले 

तू समोर येताच 

बहरून गेले

मन माझे का 

बर उतावीळ झाले

कळेना गं मला

काय झाले माझ्या मना

न पाहता गं तुला 

हे एक क्षणही राहीना


आठवण तुझी गं 

सारखीच येते 

मनाची या माझ्या

काय दशा गं होते

कसे सांगू मी तुला

या मनातील कळा

मनातील काहीच 

नाही कळेना मला

जेंव्हा मनातील गोष्टी 

फक्त मनालाच कळतात

यालाच का गं 

प्रेम असे म्हणतात

यालाच का गं 

प्रेम असे म्हणतात


Rate this content
Log in