अशी एक तरी मैत्रीण असावी
अशी एक तरी मैत्रीण असावी
दुःख माझं न सांगता
समजून घेणारी
मनातलं माझ्या
सहज ओळखणारी
नेहमी माझेच
स्वप्न पाहणारी
अशी कुणी तरी माझी
मैत्रीण असावी
ठेच मला लागता
इजा तिला होणारी
स्व:ता पेक्ष्या जास्त
माझी काळजी घेणारी
मला सोडूनि
क्षणभरही न राहणारी
अशी कुणी तरी माझी
मैत्रीण असावी
कुठल्याहि प्रसंगी
माझ्या सोबत राहणारी
संकटात मला कधी
न एकटं सोडणारी
सुख-दुःखात नेहमी
माझा साथ देणारी
अशी कुणी तरी माझी
मैत्रीण असावी
मी कितीही रागवलो तर
राग न येणारी
नेहमी मला
समजून घेणारी
एका smile मध्ये
मला आनंदी करणारी
अशी कुणी तरी माझी
मैत्रीण असावी
नेहमी चेहऱ्यावर
प्रसन्नता असणारी
बघताच तिला माझा
सारा शिन जावा
अशी ती प्रसन्न असणारी
प्रेम माझ्यावर
निरंतर करणारी
अशी कुणी तरी माझी
मैत्रीण असावी
सोबत माझ्या नेहमी
आनंदी राहणारी
प्रेम माझ्यावर
खूप सार करणारी
तिच्या साठी मी
आणि माझ्या साठी
फक्त तीच असणारी
अशी कुणी तरी माझी
मैत्रीण असावी
