पाऊस
पाऊस
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यासाठी परवणी तो
माझ्यासाठी खोळंबा आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्या डोळ्यात साठतो तो
मला नकोसा वाटतो आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिला रोज भिवतो
पण मला टाळतो आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यासाठी तो उत्सव
माझ्यासाठी सुट्टी आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यावर प्रेमाने बरसतो
मला गुदगुळ्या करतो आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यासाठी चोहीकडे हिरवळ
माझ्यासाठी चिखळ आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यासाठी तो प्रेम
माझ्यासाठी कविता आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यासाठी तो भेठ
माझ्यासाठी त्याग आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्यासाठी तो आज
माझ्यासाठी आठवण आहे...
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
ती भिजताना प्रेमाने
मी फक्त पाहात आहे....
तिचा आणि माझा
पाऊस वेगळा आहे
तिच्या घरासमोर अंगणात
माझ्या खिडकी बाहेर आहे...
