पाऊस
पाऊस
पावसाचा हा कहर
कधी थांबेल पाऊस ?
साजणही गेला दूर
वाट पहाते थकून
पावासाच्या ह्या धारांना
खंड नाही मुळी बाई
कधी येशील साजणा ?
मन था-यावरी नाही
कुंद गार हवेमधी
मिठीमधे मला घ्यावे
चिंब ओल्या धारेमधी
गूज मनीचे सांगावे
कोसळत्या पावसात
सख्या ये रे झडकरी
दोघे ओलेत्या मिठीत
प्रीत रंगेल बावरी
