STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational Others

3  

Sarita Kaldhone

Inspirational Others

पाऊस माझ्या मनातला...

पाऊस माझ्या मनातला...

1 min
366

निळया सावळ्या मेघ मल्हाराचं गीत

पाऊसलेल्या धरेचीही वेडी प्रीत


 मातीतून उठला मृदगंध दरवळे अत्तर 

नभ धरतीच्या मैफीलीतलं मिटलं अंतर


बेधुंद मनू अन बेफाम कोसळणारा 

उन्मादाचे क्षितीज तोलत बरसणारा


पिसाटाचा वारा चिंब चिंब भिजलेला 

थेंबाचं पैजण पायी बांधलेला 


कोवळी पालवी सोबत कोवळे शहारे

मखमली ऋतुरंगांचे अनोखे पहारे 


तुझ्यातून फुलला संसार प्रत्येक कणातला

याच धुंदीत हलकेच बरसला पाऊस मनातला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational