STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

पाऊस खुळा

पाऊस खुळा

1 min
13.9K


पाऊस हा खुळ्यागत का वागतो

मला भेटण्याआधी तुला का भेटतो

कधी तुझ्या स्वप्नी कधी लेखणीने बरसतो

तरी तुझ्यासाठी उगाच का तरसतो

धाडतो निमंत्रण मीही त्याला यायचे

मग मलाच पाहून का कुत्सित हसतो

तुला भिजवण्या कसा सरसर कोसळतो

माझ्या मनाच्या वाळवंटात मात्र मला तळपवतो

अशी काय मोहिनी टाकलीस तू त्याच्यावर

अनोळखी दृष्टीन मला निरखतो

तुझ्यासाठी मात्र सुरात बरसतो

मला मात्र थेंबाथेंबाला तरसवतो

असा हा खट्याळ वेडा पाऊस तुझ्यावर मरतो

मला हरवून तुझ्यावरी प्रेमाची किमया करतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance