पाऊस धुंद
पाऊस धुंद
पाऊस धुंद फ़ुंद
गेले अंगण भरून
सये जूनी याद आली
गेले मन मोहरुन
असाच पाऊस
अशीच सांजवेळ
थरारली तनुवेल
आले थोराड वादळ
घोंगावत्या वादळात
आधार सखयाचा
जसा झाडाला पडला
विळखा वेलीचा
थरथरत उभी मी
बावरले ग मनात
सख्याच्या बाहूत
गेले मिटून पानात
गंध श्वासाला मिळाला
बहरला रोम रोम
आणि पृथ्वीच्या गर्भात
अंकुरेल नवा कोंब

