STORYMIRROR

Sonali Kose

Romance

4  

Sonali Kose

Romance

पाऊस आणि तू

पाऊस आणि तू

1 min
373

पहिला पाऊस पडला की

चिंब भिजावसं वाटतं

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण

मला जगावसं वाटतं


बरसलेल्या त्या चिंब सरिंमध्ये

मला तूच हवाहवासा वाटतोस

धरलेला तुझा घट्ट हाथ

आणि तूच मला मिठीत घेतोस


पावसाचा मनसोक्त आस्वाद घेत

मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं

टपोऱ्या थेंबांनी साचलेल्या पाण्यामध्ये

तुझ्याशी पावलोपावली चालावस वाटतं


गालांवरती ओघडलेल्या

पावसाच्या थेंबाला

तू अलगदपणे दूर सारतोस

एकटक बघता बघता हळूच

मला लाजवूनच टाकतोस


पाऊस आणि तू

जणू एक सारखेच

दोघेही मस्त मगन होता

प्रेमाच्या या वळणावर

बेधुंद होऊनी बरसता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance