पाऊस आला
पाऊस आला
सुगंध घ्यावा मातीचा
छंद हा घ्यावा मोराचा
मनात आनंद घ्यावा
बरसणाऱ्या सरींचा ||१||
उसळला हा समुद्र
वारा घुसळतो ढग
बघता आनंद होई
अश्रु बरसती मग ||२||
ऑफिस असे रोजच
कामे नेहमी असती
मनी वाटते भिजावे
हौस अधुरी राहती ||३||
सर्दी पडसे रोजचे
औषध नसे वेगळे
गुणकारी असे काढा
ज्याचे रंग हे वेगळे ||४||
बघा निसर्ग बहरे
आनंद हा चोहीकडे
मनी बरसे पाऊस
आनंदुनी चहूकडे ||५||