STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

4  

Sanjay Dhangawhal

Inspirational

*'पाऊलवाट'*

*'पाऊलवाट'*

1 min
219

घराबाहेर पडणारे पहिले पाऊल

कुठे पडणार कळतं नाही

पाऊल नेमके टाकले तर

कुठेही वळण घेत नाही

वाटा खुप असतात

दाखवणारे योग्य असले की

इतरत्र फाटे फुटतं नाही

चांगल्या वाटेवर कधीच काटे टोचत नाही.


वाट दाखवणाऱ्यापेक्षा

वाट चुकवणारे माणस पावलागणिक असतात

वेगळी वाट दाखवून हसत असतात

वाट बदलवली तरी कोणीतरी आडवा होत असतो

पळणाऱ्या पावलांना मधेच थांबवत असतो


तेव्हा पाऊलवाट योग्य की अयोग्य

जरा निरखून बघायचं

वाट दाखवणाऱ्याला

पारखून घ्यायचं

कारण सरळमार्गी चालणारी माणस

कोणाची प्रगती पाहून थांबत नाही

आणि दुसऱ्यांच्या वाटेवर 

जराही पाऊन टाकतं नाही


खर सांगायच तर

यशाचा शिखर डोक्यावर घेवून चालणारा माणूस

कोणाला बघवत नाही

वाट चुकलेली माणसांची पावलं

चांगल्या वाटेचा आर्दश घेत नाही

असे कितीही चुकिचे गतिरोधक आलेत

तरीही चालतचं रहायच

वाट चुकवणाऱ्यांना टाळतं जायचं


दिशा चुकवणाऱ्यांच्या वाटेला न जाता

या आयुष्याच्या प्रवासात

आपणच आपली पाऊलवाट निवडायची असते

हळुवार वळण घेऊन

योग्य महामार्गाला जोडायची असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational