STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

4  

Deepali Mathane

Tragedy

पाणी.......

पाणी.......

1 min
215

पाण्यासाठी पायपीटही 

करिती माय बहीणी

घागर भरणे घेऊनी 

डोईवर भरे पाणी

  एकाएका थेंबासाठी

  वणवण फिरती रानी

  नदी आटली झरे आटले

   वाहे नयनी पाणी

पाण्याचे हे मोल 

न समजे आम्हावाणी

जीवाच्या पार भारी

घागरीने भरे पाणी

  जाणा तुम्ही पण मोल

  अन्यथा येईल नयनी पाणी

  जनावरे ही कासावीस

   धावे रानीवनी

घामाच्या धारांनी सजली

मायमाऊली केविलवाणी

येऊ द्या ह्रदयाला पाझर

फिरे पहा ती अनवाणी

   म्हणूनच एक विनंती

   वाचवूया आपण पाणी

   अन्यथा फिरेल अपुली 

   माय ही अशीच अनवाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy