पान
पान
हिरवं पिवळं छोटस पान
अहो पळताना मी पाहिलं
असे कसे, का हे पान पळतंय
याच विचारानं मला हेरलं.....
पान तर होते जमिनीवर
वाऱ्याची झुळूक आली
मोरपिसी मवूशार पानाला
जागे करून हलवून गेली....
गाडी आली जोरात आणि
पानाला धक्का मारून गेली
पान मात्र जरा घाबरलेच
पानाला खूप भीती वाटली....
पळत सुटले छोटेसे पान
लागले इकडे तिकडे धावायला
जीव मुठीत घेऊन आता
स्वतःचा जीव वाचवायला....