STORYMIRROR

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Tragedy

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Tragedy

पाखरांच्या आठवणी

पाखरांच्या आठवणी

1 min
11.6K

दूर गेल्या पाखरांना साद येथून घालते

सांजवेळी मी स्मृतींची सहज पाने वाचते 


आईला विसरुनी गेली 

दूर देशी पाखरे 

दूर ती गेली म्हणून 

प्रेम का गं ओसरे


धन्यता वाटते जीवनाला 

प्रश्न लागे सार्थकी 

सोसले मी दुःख सारे 

लेकरे झाली सुखी 

एकटीने राहणे हे कठीण आता वाटते!


साद माझी ऐकोन ही 

परत या रे लौकर 

मिटोनी जा पंखात 

संपवा हे अंतर 

अंतरीची ओढ माझ्या वाट तुमची पाहते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy