STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

पाहुनियां हरी गोपाळांचे

पाहुनियां हरी गोपाळांचे

1 min
14.3K


पाहुनियां हरी गोपाळांचे चोज ।

म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥

मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती ।

खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥

कळवळला देव जाहालासे घाबरा ।

मुरली अधरा लावियेली ॥३॥

मुरलीस्‍वरे चराचरी नाद तो भरला ।

तेणें स्थिर झाला पवनवेंगीं ॥४॥

यमुनाहि शांत झाली तेच क्षणीं ।

म्हणे चक्रपाणी सावध व्हा रे ॥५॥

पेंदीयानें तो शब्द ऐकिला कानीं ।

एका जनार्दनीं स्थिर झाला ॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics