ऑनलाईन प्रेमगाथा
ऑनलाईन प्रेमगाथा




आठवतंय का ती वेळ
जेव्हा दूर पलिकडे बसून
केला होतास तू मला
पहिला ई-मेल
आठवतंय का ती वेळ
रिप्लाय काय असेल
पाहण्यासाठी होतास
जागा तू कितीतरी वेळ
आठवतंय का ती वेळ
जेव्हा भरपूर बोलायचो
जग चालायचं एकीकडे
आपण अलिप्त असायचो
फोन वरच करून propose
केलंस तुझ्या घरी disclose
मी ही त्वरित होकार दिला
तुझा प्रस्ताव स्वीकार केला
प्रश्न होता माझ्या घरचा
कसा आता सोडवायचा
नवस केले खूप देवाला
साकडं घातलं भवानीला
घरी मिटिंग झाली सेट
सर्वांचा एकच प्रश्न
कुठे झाली तुमची भेट
आता कसं सांगावं राव इंटरनेट
मैत्रिणीचा भाऊ म्हणून
दिली जुनी theory ठोकून
घरच्यांनीही विश्वास ठेवला
अगदी डोळे झाकून
शेवटी भवानी पावली
घरच्यांचा आला होकार
सोबत राहायचे स्वप्न
झाले आपले साकार