ओळख
ओळख
मनात जे रुजले होते
ओठांवरती आज ते आले
आजवर जे साचले होते
क्षणात भुरकण उडून गेले.
तिचा हात घेऊनि हाती
अलगद तिला जवळ केले होते
आसवांचे मोती हे
तिच्या नयनी शोभत होते
दोन मनांचे मिलन हे
सुगंधीत झाले होते तन मन हे
नाजुक अशा या क्षणी
विपरीत काही घडले होते
दवबिंदू हे जीवनाचे
संथपणे चोखले होते
ओळख तिची अन् माझी
खरी किती जाणले होते.

