STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Romance

4  

Chaitrali Dhamankar

Romance

ओघळ

ओघळ

1 min
197

कोण्या एका सायंकाळी

 एकांत होता नदीकिनारी 

 हातातील ते पत्र वाचिता 

 आठवली ती रात्र रुपेरी ||


 रम्य रात्री त्या काय घडले 

 वर्णन होते पत्रामध्ये 

  नकळत पडले पाऊल वाकडे 

  हात घेतला हातामध्ये || 


  त्यास वाटले चुकलो आपण 

  पहाट होता कवेत आला 

  मनात माझ्या प्रेम भरूनी 

  काळीज मात्र घेऊन गेला ||


 रात्रीनंतर त्या कधी न दिसला 

 आजपर्यंत प्रियकर माझा 

  वाट पहाते तुझी अजुनही 

  तूच माझा कोणी न दुजा || 


  आज अचानक दाराबाहेर 

  दिसली एक सावली पुसटशी 

  पाहून समोर मूर्ती तयाची 

  मन भांबावले झाले वेडीपिशी || 


  भर पावसात भिजून आला 

  गालावरही ओघळले पाणी 

डोळ्यातील त्या भाव सांगती 

 परतलो मी तुझ्याचसाठी राणी || 


 प्रेमातच ते पत्र फाडले 

  पावसात मी त्यास बिलगले 

  चुक न केली आपण काहीच 

  प्रेमच आहे आम्हा उमगले || 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance