ओढ
ओढ
तुला पाहून उगाचच
वाटते हुरहुर
भावनांचे मनात
उठते काहूल
हळुवार प्रीतीची मनाला
लागली चाहूल
यौवनाच्या उद्यानातले
पहिलेच हे पाऊल
तुझ्या पुरुषी स्पर्शाची
लागली अनिवार ओढ
तुझ्या प्रेमळ नजरेची
त्याला मिळावी जोड
माझ्या सुंदर स्वप्नातच मी वावरते
स्वप्नातून जागी होताच
स्वतःला सावरते
पण तुला कोठे आहे त्याची जाणीव
कोणीतरी अप्सरा भरून
काढेल माझी उणीव
तुझ्यावर प्रितीची उधळण
आयुष्यभर करत राहील
माझ्या हृदयाच्या मंदिरात
केवळ तुलाच पाहील

