STORYMIRROR

Savita Kale

Romance

3  

Savita Kale

Romance

ओढ

ओढ

1 min
492

तुझ्या भेटीची मी

कैक स्वप्ने पाहिली

आस एक, ओढ तीच

श्वासास लागली


आठवांच्या गंधाने

रात्र सारी दरवळली

स्पर्श रेशमी होताना

प्रीत माझी मोहरली


मांडव तो नभाचा

तारकांनी सजलेला

भेटीस आपल्या

तो ही आतुरला


आकाश सारे लख्ख

चांदण्याने नटलेले

अबोल एका कळीचे

फुल आज फुललेले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance