STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

4  

Shila Ambhure

Romance

नववधू

नववधू

1 min
453


उभी मी बोहल्यावरी

ल्याले नवरीचा साज.

लेक लाडकी बापाची

परक्याची झाली आज.


हात सुटला पित्याचा

नाही मायेची सावली.

वरासंगे चालते मी

बघा ही सप्तपाऊली.


विवाहप्रसंगी आज

द्विधा झाले माझे मन.

ओलांडला उम्बरठा

सुटे माहेर, अंगण.


थोड़े हसू जरा आसू

हीच विवाहाची कथा.

अनुभव घेता कळे

नव्या नवरीची व्यथा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance