नवा उत्साह
नवा उत्साह
पाहताक्षणीच तुला सखे
नवा उत्साह संचारतो मनात
उठते तरतरी ची लहर जणू
शरीरातील रोमारोमात
आसुसलेले असतात नयन
फक्त तुझ्याच मुखदर्शनासाठी
झालाय जन्म माझा जणू
नजरेतील प्रेम अनुभवण्यासाठी
पाहतो जेव्हा जेव्हा मी तुला
माझे देहभान विसरून जातो
स्वर्गातील अप्सरा भूवर आली
याचा साक्षात प्रत्यय येतो
प्रगती माझ्या जीवनातील
फक्त तुझ्यामुळेच आहे
नवा उत्साह टिकविण्यासाठी
साथ तुझी हवी आहे

