नव लक्ष गोपाळ
नव लक्ष गोपाळ
नव लक्ष गोपाळ यमुनेतटीं ।
उभे राहुनी दृष्टी पाहताती ॥१॥
खल्लाळाचा शब्द कानीं तो ऐकिला ।
पेंदा पुढें झाला सरसाउनी ॥२॥ .
पेंदा म्हणे गडिया आपणा पाहुनी यमुना ।
हुंबरी घेती जाणा पहा पहा ॥३॥
एका जनार्दनीं पाहुनिया देव ।
करितां उपाव नवलाचा ॥४॥
