नसेल कोणीच आपलं..
नसेल कोणीच आपलं..


मला मरणाची भिती नाही
पण जन्म वाया जाऊ नये,
कर्म आपल्या हाती आहे
दोष दैवाला देऊ नये.
कोणी नाही कुणाचं
आपणच जपावी नाती,
मेल्यावर काय फायदा
कोणी रडून किती...
असेल नशिब फुटके
नसेल कोणीच आपलं,
औलाद ही बेईमानी
आपलंच सारं चुकलं.
पश्चात्ताप होतो आहे
आपल्याच चांगलं वागण्याचा,
प्रयत्न करतोय तरीही
माणूस म्हणून जगण्याचा.
नाही उरलाय भरोसा
माझाच माझ्या रक्तावर,
रडतील तर सारेच
जळणाऱ्या सरणावर..