नकळत डोळे पाणावले
नकळत डोळे पाणावले
सर पावसाची बरसली
अलगद क्षण विसवला
दुखाच्या तप्त भोवळीला
क्षण सुखाचा गवसला
सावली विस्तीर्ण होता
गारवा मनी जाणविला
स्पर्श थेंबाचा हलकेच
मनी उरुनी राहिलेला
जरा अवखळ जाहल्या
जलधारा त्या नभातील
एकल्या वाटेस भेटल्या
साथ होऊनी जन्मातील
क्षण मनात भरलेला
आसवात या ओघळीला
क्षण सोबतीचे आठवला
नकळत भाव तो दाटीला
कळ हृदयाची जाणतेही
सर पावसाची कोसळेल
विरहाचा क्षण आठवुनी
नकळत डोळे पाणवले...

