नजरानजर
नजरानजर
रिमझिम पावसात
मी बाई बाहेर पडले
थेंबोथेंबी जलधारात
चिंब चिंब भिजले...
साजनाने मला हो
लांबूनच हं पाहिले
मन त्याच्या प्रीतीच्या
झुल्यावर छान झुलले...
दिसताच ओलेती समोरी
सजनाच्या की आली
प्रेमाला बाई उभारी
लाज आली माझ्या गाली...
साजनाने घेतली मला
तशीच ओलेती कुशीत
मग मी पण आले बाई
प्रीतीच्या छान खुशीत...
वर्षाव केला साजणाने
प्रीतीचा आणि प्रेमाचा
दोघांनी मग घेतला
मोद क्षणिक सुखाचा...
नजरानजर झाली आमची
लाजेनं चूर चूर मी झाली
समर्पण केले एकमेकांनी
आनंदाची बरसात केली...

