निसटले क्षण सारे
निसटले क्षण सारे
जे जगायचे होते,,
तुझ्या संगे सख्या रे,,
राहुनिया गेले सारे,,
निसटले क्षण सारे.
बर्फ होऊनि गोठले,,
उन्हात ते वितळले,,
आठवणी मागे ठेवूनि,,
निसटले क्षण सारे.
डोळ्यात प्रेम दाटले,,
नाही कधी भेटले,,
काळासंगे तेही आटले,,
निसटले क्षण सारे.
वेड लावूनि गेले,,
विरह देऊनि गेले,,
मन हेलावून गेले,,
निसटले क्षण सारे.
जीव हा तळमळे,,
बसले ह्रदयाला हादरे,,
व्याकूळ मन हे रडले,,
निसटले क्षण सारे.