STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Abstract Tragedy

4  

Sanjay Dhangawhal

Abstract Tragedy

*निषेध*

*निषेध*

1 min
222

घेवू नकोस घुगंट आता

देहाने तू विटाळली

दाखवू नकोस त्या जखमा आता

वेदना कोणी न पाहीली


लक्तरे झालीत लाख हातानी

विकृतीची लाट उसळली

लाथाळली गेलीस 

लाख पायांनी

तू कुणास नाही दिसली


का विवस्त्र झाली माणूसकी आता

लाज देहाची नाही कोणी झाकली

गिधाड नजरांची गर्दी येथे

तुझी तू न राहीली


झाला श्वास शांत तेव्हा

मेणबत्ती फक्त पेटली

केला मरणाचा निषेध तेव्हा

फक्त श्रध्दांजली वाहीली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract