निसर्ग -हास
निसर्ग -हास
सिमेंटच्या जंगलात घुसमटतोय हिरवाईचा श्वास,
बेछूट तांत्रिक प्रगति करतेय पर्यावरणाचा -हास.
आज विसरून उद्या बनवतोयअतिप्रगत मानव,
निसर्ग तुडवून जन्म घेतोय प्रदूषणाचा दानव.
वेळीच जागे न झालो तर दुःस्वप्न होईल खरे,
शांत-शीतलता विरून पसरतील ज्वालामुखींचे झरे!