निर्झर झरा...
निर्झर झरा...


घोंघावणारा वारा नभिचा
धरणीस स्पर्श करणार आहे
भितीच का धरावी तयाची
जो हवेतील बदल आहे?
कितीही आली अशी वादळे
पेलण्यास सदैव समर्थ आहे
तुझ्या त्सुनामीची ही गाथा
जीवहानीसह माहित आहे
भंगलेल्या "त्या" संसाराला
सौंदर्याने "तू" पोसले आहे
वासनेच्या "त्या" लालसेने
कुणाचे जगणे... संपले आहे
आतातरी निरंजनी घेऊन
अंधारात काय शोधत आहे
पाक असेल "ते" मन पण
दिव्याखाली अंधार आहे
नको उडवू सदा शब्दगोळे
तोफ क्षमताच माहित आहे
थांबव हल्ले प्रतिशोधाचे
निर्झर झरा निसर्ग आहे