बलिदानाचे भान ठेवूया
बलिदानाचे भान ठेवूया

1 min

18
भूवरी असा तळपला तो
सर्व विषमता नष्ठ झाली....
तुझी जगण्याची हेळसांड
तेजाने भस्मसात केली.....
मानवता दिली आम्हाला
माणूसकी रहावी जीवंत ......
कशे? कुठे? काय? शोधूया
माणसाला माणूसच निवांत .....
कुठे आहे? तुझी ती
सिंहगर्जनेची ललकारी..!
का? फिरतो आज तू
दुसऱ्याच्या दारोदारी....!
मावळतीला सूर्य गेला
तेज उद्याचे द्यावया.......
सूर्योदयाच्या प्रतिक्षेत आम्ही
एकसंघ भारत पाहूया......
नवी उमिद अन ताकद
ज्यांनी दिली जगण्याची ........
बलिदानाचे भान ठेवूया
घेवूनी शपथ एकतेची........