पुन्हा काही दिवस...
पुन्हा काही दिवस...

1 min

27
विश्वास होता म्हणून
बी टाकले मातीत
खेळतो लपंडाव तू
वेदना होतात छातीत
सरीवर सरी नकोच
रिपरिप तुझीच बरी
धो धो येणं जवळ
धडकी भरते उरी
कासावीस होतो जीव
जेव्हा लपून हसतो
उधाण येते मनाले
जेव्हा नकळत पडतो
आता हाती येईल
मनात आहे आस
असाच खेळ राहूदे
रिमझिम वाटे खास
आस सोडणार नाही
पुन्हा दिवस काही...
मातीत गेले आयुष्य
सौभाग्य माती माही