निर्भया
निर्भया
मी निषेध नोंदवतो, मी धिक्कार करतो
पुरुष मी नर-पशूंचा बहिष्कार करतो.
कलंक पौरुषत्वाला ते बलात्कारी जे,
ह्या अत्यचारींना हद्दपार करतो.
लाज वाटे मला वाट चालताना आता
पुरुषार्थ बुडवणार्यास आज बुडवतो
साशंक या नजरा रोखून पाहतात आज
मान माझी झुकवी त्यालाच झुकवतो
श्वास मोकळा आता घेइन तेंव्हा
दंडीत होइल जेंव्हा मस्तवाल तो
