STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

*निरभ्र*

*निरभ्र*

1 min
170

व्हावं निरभ्र कधीतरी त्या निळ्या आकाशासारखं,

 ते काळे ढग विचारांचे फेकून, बरसून घ्यावं

लहरावं कधीतरी मुक्तपणे, वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर,

जरी चुकल्या दिशा, परत त्या मार्गी यावं


प्रवाहाबरोबर स्वच्छंद वहावं, त्या क्षणांच्या सोबतीने,

करावा तो क्षणही आपलासा, अडथळ्यांना ओलांडाव

स्तब्ध रहावं कधी, विचार तरंगांना उमटू द्यावं, 

अंतरंगातील त्या लहरींना संपताना अनुभवावं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract