STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others Children

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others Children

निरागस

निरागस

1 min
560

गोड किती निरागस बालपण

कालपण आजपण उद्यापण...!!


सानुला जीव इतकुसा गर्भात

आईचे आनंद मावेना गगणात...!!


गर्भातल्या त्या सुक्ष्म हालचाली

नसे दुःख,चिंता निरागस चाली..!!


नऊ महिने नऊ दिवस जाती

जागल्या आईने कित्येक राती...


मायलेकरांचे ते प्रेम निरागस

दृष्ट लागण्या जणू गोजिरे सालस...!!


निरागस ती माया,निरागस ते प्रेम

मायबापा पेक्षा जगी आहे का कुणी सेम...


निरागस ते बालपण दे गा देवा

जगी ना कोणाचा द्वेष,मत्सर ना हेवा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational