STORYMIRROR

sarika k Aiwale

Abstract

4  

sarika k Aiwale

Abstract

निरागस संचित ते

निरागस संचित ते

1 min
166

निरपराध क्षण निरागस ते 

ओंजळीत आपसुक ओझरती 

मनातील तळी खोलवर ती 

कळ काळजातली उमटती 


अंतरीचे भाव ही निरागस ते 

अधारावर शब्द तूझे बरसती 

सांजवेळी मनी निरांजन ती

दीप तो आठवणीचा लावती 


नजरेतील आस निरागस ती

भान सूर्याला किरणे मागती

नयनी आसक्तीची जान ती 

अश्रुंतुनी सल ती वाहत होती 


अंतरिम जाण निरागस ती 

परतुनी मनी ना ती साचती 

घडुनी गेल्या घटना जीवनी 

पुन्हा आयुष्यास का श्वास देती


उजळूनी पहाट निरागस ती 

मनास आशेची लाच का देती 

एकदाची बदलली कूस जीवनी 

परतुनी बदलाव न अंगीकारती 


आयुष्यात संचित निरागस ते 

भान जागण्याच विसरु न देती 

उरुनी पाहिले जरी इतरात मी

परतुनी ती ओळख ही न देती 


ओंजळीत स्वप्ने निरागस ती

अयुष्यात या जन्मू पाहती 

पापणी आडाचे जग सोडूनी

जगातील एक ते होऊ पाहती 


वळणावरची रात्र निरागस ती 

जीवनात पुन्हा उजडू पाहती

परतुनी बदलाव तो याच मनी  

थकल्या पावलांस नको वाटती 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract