STORYMIRROR

Sakharam Aachrekar

Tragedy

3  

Sakharam Aachrekar

Tragedy

नेहमीचे...

नेहमीचे...

1 min
283

रोज तुजला पाहणे, मज नेहमीचे

शब्द ओठी गोठणे, मज नेहमीचे


सोबती ना आज माझी, सावलीही

अन तरी हे चालणे, मज नेहमीचे 


भेट ती ठरते अशी, अन रद्द होते 

मग मना समजावणे, मज नेहमीचे 


तू नको देऊ तुझे, हसणे उधारी 

आसवांचे वाहणे, मज नेहमीचे 


सांगण्याचा तुज कितीदा, यत्न केला 

भाव हृदयी रोखणे, मज नेहमीचे 


वर्तमानी नित्य दिसतो, मी तुला पण 

भूतकाळी राहणे, मज नेहमीचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy