नदीकिनारी
नदीकिनारी
नदीकिनारी तुझ्या शिरी,
मी घडा दिला ग पाण्याचा
हसलीस तू, मी फसलो ग
दोष असे हा कोणाचा
तरातरा पाण्याहुनी परते
रोज कशी गोजा अक्का
ती ही थांबली काल जरा
तिने साधला तो मोका
सांगू लागली घरोघरी
पोर बिघडला कान्यांचा
अल्लड पोरी, तरुण धुवीत होत्या
भटजी होते पारावरती
करीत एका दशनी
प्रसंग टिपला साऱ्यांनी
प्रेमिका जवळी येण्याचा
नावे आपली झळाळली
घराघरांचे भिंतीवर
नाव कुणाचे घ्यावे मी
आलीत पोरं खंडीभर सुगी संपली
आला मोसम कंड्या पिकण्याचा
गावरान ह्या मजनूचे
स्वप्नी लैला आलीस तू
रसरसलेल्या मिठीत गं
शृंगाराने न्हालीस तू
स्वप्नी रंगला देखावा,
सिनेमातल्या गाण्याचा