नभाच्या पल्याड
नभाच्या पल्याड
नभ दाटले आभाळी
मनी हूरहूर दाटे.
दूर नभाच्या पल्याड
मज प्रियकर भेटे.
येते पावसाची सर
मन फुलून निघते.
तेथे प्रियकर उभा
त्यास आयुष्य मागते
येतो पाऊस गारवा
मन गंधाळून जाते.
शपथ प्रियकरा
रोज याद तुझी येते
मन सैरभैर होते
स्तब्ध थांबातात मेघ.
कसा आवरू दिलवरा
माझ्या मनीचा आवेग.
रिमझिम पावसाची
माझा दिलवर येतो.
सा-या सुखांची आरास
माझ्या ओंजळीत देतो

