STORYMIRROR

धनाजी बुटेरे

Others

4  

धनाजी बुटेरे

Others

भार

भार

1 min
326

झाले नशीब बैमान

आली डोक्यावर मोळी

किती कष्टलो झुंजलो

तरी रिती रिती झोळी


काल अंधारात होतो

आज आमुशा दारात

किती जखमा पोसल्या

कशा सांडल्या उरात


जरी राबतो कष्टतो

तरी संकटे आमाप

चंद्रमौळी झोपडीला

असे काळोखाचा शाप


माझ्या घामाच्या धारांनी

डोले कपाशीचे बोंड

आली आवसं आसवं

तिचे काळे काळे तोंड


किती काळोखाच्या राशी

झोपडीच्या झापाआड

किती उपाशी तापाशी

दिसं सरले आपार


काय भयानं काळोख 

कसा पेटवावा दिवा

लेक उपाशी झोपली

घोर लागलाया जीवा


आता नाही सोसवत

खांद्यावर असा भार

धाड यमा तुझा रेडा

होतो त्यावर मी स्वार


Rate this content
Log in