STORYMIRROR

धनाजी बुटेरे

Others

3  

धनाजी बुटेरे

Others

पाऊस प्रियकर

पाऊस प्रियकर

1 min
140

सुरांच्या मस्त लकेरी

तो अलगुज पावा घेतो.

हा पाऊस प्रियकर माझ्या 

ओठांचा चावा घेतो.


तो मिठीत घेतो मस्त 

आन् भिजवून चिंब घेई.

सृष्टीचे दान सख्या रे

या अधरावरती देई.


तो खट्याळ वारा येतो

वस्रांशी करतो चाळे.

हा पाऊस प्रियकर माझा

प्रेमाचे सजवी सोहाळे. 


 पडताच घराबाहेरी

तो पाठीमागून येतो.

बंधने झुगारून सारी 

तो मिठीत मजला घेतो.


अवचित तुझे रे येणे 

चौकातील पारावरती. 

मी वाट तुझ रे पहाते

सकाळी दारावरती. 



Rate this content
Log in