तिचा पाऊस
तिचा पाऊस
1 min
190
तिला नाही आवडत पाऊस
ती पावसाळा टाळू लागली
तिची आठवण मग
पावसाला छळू लागली
ती निघताच घराबाहेर
पाऊस रिमझिम बरसतो
फक्त ती दिसावी म्हणून
पाऊस रोज तरसतो
ती मश्गुल असते फुलाफुलांत
पाऊस ढग होऊन फिरतो
तिला नाही कळत पावसाच मन
पाऊस तिच्यासाठी झुरतो
भिजवावी एकदा तिला
तीच्यासह आपण चिंब व्हावे
एवढ्याचसाठी नभाने
पाऊस होऊन भूमीवर यावे
थकला पाऊस म्हणतो
'माघारी फिरायचे'
ती भिजायला तयार नाही
आपण किती झुरायचे
