STORYMIRROR

Vasudeo Gumatkar

Inspirational

3  

Vasudeo Gumatkar

Inspirational

नाती

नाती

1 min
416

असावी जिव्हाळ्याची

माणसाला नातीगोती

आणेल ती जीवनात

आपल्या प्रेमाची भरती


असावी सोबत त्यांची

क्षणात सुखदुःखाच्या

असावा थोडा आधार

गोड त्यांच्या शब्दांचा


नको ती मला नाती

जी पैशाला किंमत देते

उपकाराच्या ओझ्याखाली

नात्याला ती वाकवते


नातं तेच असते खरे

ज्यात जिव्हाळा असतो

दोन गोड शब्दांचा

ज्यात संवाद असतो


रूसवे फुगवे नेहमी

नात्यात असतात

अधिकाराने एकमेकांवर

खूप रागवत असतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational