STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Fantasy

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Fantasy

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
315

नारीशक्ती, स्त्रीशक्ती

करूणेचा तू सागर

स्नेह, माया, ममतेचा

तूच खरा गं जागर......!!


नररत्नाची खाण तू

तूच गं ईशस्वरूप

निसर्गाचे वरदान

दिले सुंदर ते रूप....!!


तूच जिजाऊ, सावित्री

तूज अहिल्या, रमाई

तूच आजी,कन्या आत्या 

तूच मामी,बहीण आई....!!


नानाविध रूपे तुझी

सहनशीलता,धैर्य

तूच दुर्गा,तू भवानी

नारी तुझे ते औदार्य....!!


फक्त एक दिवस गं

तुझा नको उदोउदो

मनोमनी तुझ्यासाठी

सदासर्वदा प्रेम नांदो.....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action